मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येथे रविवार, १४ जून २०२६ या दिवशी सायंकाळी पाच वाजता हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात श्रीमती अनुजा झोकरकर आणि श्रीमती श्रुति विश्वकर्मा-मराठे यांचे गायन सादर होणार आहे. तबल्यावर साथसंगत  प्रणव गुरव तर संवादिनीवर  अमेय बिचू यांचा असेल.
अनुजा झोकरकर इंदूरच्या संगीतकुलातील प्रतिभावान गायिका. लहानपणापासून शास्त्रीय संगीताची आवड असलेल्या अनुजांनी हिंदुस्तानी शास्त्रीय गायनात विशेष प्रावीण्य मिळवले आहे. त्या गायिका, शिक्षिका आणि कलाकार म्हणून सक्रिय आहेत. त्यांच्या गायनात रागदारी, टप्पा, भजन इत्यादींचा समावेश असतो. श्रुति विश्वकर्मा-मराठे तरुण आणि उभरती शास्त्रीय गायिका आहे. संगीतकुलात जन्मलेल्या श्रुतिंनी आजोबा नारायण शास्त्री गोडबोळे यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले. मधुर आवाज आणि उत्कृष्ट प्रस्तुतीसाठी त्या ओळखल्या जातात. त्यांनी अनेक युवा संगीत महोत्सवांमध्ये भाग घेतला आहे आणि श्रोत्यांच्या मनावर आपली छाप पाडली आहे.
हा कार्यक्रम खुला असून अधिकाधिक रसिकांनी त्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ०२२-४३०४१५०.
०००००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *