कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा उपक्रम
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील करदात्यांना मालमत्ता करात मिळणा-या सवलतींचा लाभ मिळण्यासाठी आणि मालमत्ता करासंदर्भात इतर माहिती उपलब्ध होण्यासाठी त्यांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी हा मालमत्ता क्रमांकाशी नोंदणी करण्याची सुविधा महानगरपालिकेच्या www.kdmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महानगरपालिकेच्या www.kdmc.gov.in या संकेतस्थळावर Property KYC वर क्लिक करा आणि Property No नोंदवून, आपला मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी अपडेट करा.
हि सुविधा करदात्यांच्या सहकार्य व सहभागावर अवलंबून आहे. मालमत्ता करातील सवलतीचा लाभ घेण्यासाठी त्यांनी आपला मोबाईल क्रमांक व ई-मेल आजच नोंदणी करा. मोबाईल क्रमांक नोंदणीची सुविधा सर्व प्रभागात कार्यालयात देखिल उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तरी, या सुविधेचा लाभ घेवून महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन मालमत्ता कर विभागातर्फे उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांनी केले आहे.
