अग्निशमन दलाची तत्परता, पाच रहिवासी सुरक्षित
दिवा, दि. ५ जुलै : दिव्यातील साबेगाव परिसरात असलेल्या दत्त निवारा सोसायटीच्या जिन्याचा स्लॅब रविवारी दुपारी अचानक कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा कोणालाही दुखापत झाली नाही. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाच रहिवाशांची सुखरूप सुटका केली. शीळ अग्निशमन केंद्राला दुपारी १२.५२ वाजता घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान एक फायर इंजिन व एक रेस्क्यू वाहनासह घटनास्थळी दाखल झाले. ही घटना साबेगाव येथील वैभव धाब्याच्या मागे असलेल्या दोन मजली दत्त निवारा सोसायटीत घडली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी तसेच अतिक्रमण विभागाचे कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत इमारतीची पाहणी करून पुढील आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.  तसेच इमारतीत अडकलेल्या प्रदीप मालुसरे (५०), प्राजक्ता मालुसरे (४२), चेतन मालुसरे (२१), गणेश राणे (४८) आणि आरोशी कुमडेकर (१४) या पाच रहिवाशांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षित सुटका केली.
000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *