मुंबईच्या रस्त्यावरील मॅनर्स वर आलेखन करून जाळ्या बसवा
शिवसेना नगरसेवक अंकित सुनील प्रभू यांची आयुक्तांना सूचना
मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील सिमेंट काँक्रीट टप्पा १ व २ प्रमाणे तयार करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांवरील मॅनहोल्सवर आलेखन करून जाळ्या बसवाव्यात त्याचप्रमाणे नविन तंत्रज्ञान वापरुन मॅनहोल्सचा माहितीसंच उपलब्ध होईल अशी सुविधा करावी अशी सूचना प्रभाग क्रमांक ५४ चे शिवसेना (उबाठा) नगरसेवक अंकित सुनील प्रभू यांनी महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे केली आहे
मुंबईत शहर व उपनगरांत एकूण १०३९२६ मॅनहोल्स आहेत. यापैकी कितीतरी मॅनहोल्स वर सरंक्षक जाळ्या बसवल्या गेल्या नाहीत अश्या रस्त्यावरून चालताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. दोन जुलै रोजी  दुर्दैवी घटनेची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असून, नागरिकांच्या सुरक्षेबाबत आता ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे प्रभाग क्रमांक 54 चे शिवसेनेचे उद्धव ठाकरे गट नगरसेवक आणखी सुनील प्रभू यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात सांगितले आहे . मुंबई शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर सिमेंट काँक्रीटीकरणाचे (CC Roads) रस्ते बनवले जात आहेत. मात्र, या रस्त्यांवर असणा-या मॅनहोल्सवर सरंक्षक जाळ्या बसविल्या गेल्या नाहीत त्याचबरोबर सदर मॅनहोल्सचा आलेखन  किंवा माहितीसंच तेथील संबंधित अधिका-यांना उपलब्ध झालेला नाही त्यामुळे असा गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचे  नगरसेवक अंकित सुनील प्रभू यांनी पत्रात म्हटले आहे
काँक्रीट रस्त्यांवर पावसाळ्यापूर्वी आणि नियमित साफसफाई करतेवेळी झाकणे उघडली जातात, परंतु काम झाल्यानंतर ती बऱ्याचदा जागेवरून गायब असतात किंवा उघडीच ठेवली जातात, ब-याच मॅनहोल्सवर बसविलेल्या जाळ्या तुटलेल्या अवस्थेत असतात किंवा तिथून चोरीला गेलेल्या असतात. असे अंकित प्रभू यांनी आपल्या पत्रात नमूद केले असून त्यांनी पुढे म्हटले आहे की अशा उघड्या मॅनहोल्समध्ये पडून निष्पाप नागरिकांचा मृत्यू होणे ही अत्यंत संतापजनक बाब आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर, मुंबईतील सर्व मॅनहोल्स सुरक्षित करणे तसेच त्यावर आलेखन करून जाळ्या बसवणे त्याचबरोबर तेथील मॅनहोल्सचा माहितीसंच उपलब्ध होईल अशी सुविधा करणे गरजेचे असल्याचे शिवसेना नगरसेवक अंकित प्रभू यांनी म्हटले आहे की, या उघड्या गटारांवर संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम ३१ मे पूर्वी पूर्ण करणे प्रशासनाला बंधनकारक होते. असे असतानाही जुलै महिना उजाडला तरी अनेक ठिकाणी जाळ्या बसवण्याचे काम अपूर्ण का आहेत, याचे स्पष्टीकरण मिळणे आवश्यक आहे. प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे आज मुंबईकर त्रस्त असल्याचे  अंकित प्रभू यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे
३१ मे ची डेडलाईन उलटूनही कामे अपूर्ण ठेवणाऱ्या आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणाऱ्या संबंधित कंत्राटदार (Contractors) आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. या गंभीर प्रकरणात प्रशासनाने त्वरित लक्ष घालून ठिकठिकाणी  आलेखन करून जाळ्या बसवण्याची उपाययोजना करावी व नविन तंत्रज्ञान वापरुन मॅनहोल्सचा माहितीसंच उपलब्ध होईल अशी सुविधा करणे गरजेचे असल्याचे नगरसेवक अंकित सुनील प्रभू यांनी महापालिका आयुक्तांना  पत्राद्वारे सुचविले आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *