योनेक्स सनराइज १ली महाराष्ट्र राज्य सब-ज्युनियर  निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा
मुंबई: महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन आयोजित योनेक्स सनराइज पहिली महाराष्ट्र राज्य सब-ज्युनियर निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धेत दिविशा सिंग आणि रुद्र मनोहरने १३ वर्षांखालील मुली आणि मुले गटात एकेरी आणि दुहेरी अशा दोन्ही प्रकारात विजेतेपद पटकावले.
मुलुंड पश्चिम येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात झालेल्या स्पर्धेत १३ वर्षांखालील मुली एकेरीच्या चुरशीच्या अंतिम सामन्यात, अव्वल मानांकित दिविशाने दुसऱ्या मानांकित हेझल जोशीचा २१-१७, २१-१४ असा पराभव केला. त्यानंतर, दिविशाने हेझल हिच्यासह दुहेरी गटात आराध्या मोहिते आणि निधी गायकवाड जोडीवर २१-१५, २१-१० अशी मात केली. १३ वर्षांखालील मुले एकेरीच्या अंतिम सामन्यात रुद्रने रोनित जाधवचे कडवे आव्हान २२-२०, २१-१५ असे परतवून लावले. त्यानंतर, दुहेरीच्या फायनलमध्ये सात्विक गुप्तासह अव्वल मानांकित आदिराज शेट्टी आणि रोनित जाधव जोडीला २१-१८, २१-११ असे हरवले. १३ वर्षांखालील मुले मिश्र दुहेरी गटात टॉपसीडेड हेझल जोशी व आदिराज शेट्टीने बाजी मारताना पारस्मय राणे व रुत्वा पांडे जोडीला २१-१२, २१-१७ असे पराभूत केले.
निकाल (सर्व अंतिम सामने) – १३ वर्षांखालील मुली एकेरी: १-दिविशा सिंग विजयी वि. २-हेझल जोशी २१-१७, २१-१४. दुहेरी: १-दिविशा सिंग/हेझल जोशी विजयी वि. आराध्या मोहिते/निधी गायकवाड २१-१५, २१-१०.
१३ वर्षांखालील मुले एकेरी: रुद्र मनोहर विजयी वि. रोनित जाधव २२-२०, २१-१५. दुहेरी: रुद्र मनोहर/सात्विक गुप्ता विजयी वि. १-आदिराज शेट्टी/रोनित जाधव (२१-१८, २१-११).
१३ वर्षांखालील मुले मिश्र दुहेरी: १-हेझल जोशी/आदिराज शेट्टी विजयी वि. पारस्मय राणे/रुत्वा पांडे २१-१२, २१-१७.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *