मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने रविवार, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता कै. पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष हे तबला, सिद्धार्थ मेस्ता हे संवादिनी तर संदीप मिश्रा हे सारंगीवर साथ देणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ७७००९९४४९५.
००००००००
