000000
कल्याण : डोंबिवली एमआयडीसी निवासी मध्ये रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पाच जणांच्या दरोडेखोर टोळीने काही बंद फ्लॅट फोडून घरफोड्या केल्या आहेत. हे दरोडेखोर चेहऱ्यावर फडका लावून आले होते. त्यांच्याकडे हत्यारे असल्याने येथील रहिवाशी भयभयीत झाले असून त्यांनी मानपाडा पोलिसांना याची तक्रार दिली असून पोलिस या दरोडेखोरांच्या तपास करीत आहेत.
निवासी मधील सर्व्हिस रोडवरील सिमेन्स सोसायटी (RH 82) आणि त्याच्या बाजूची गुरुराज सोसायटी (RH 83) मध्ये हे दरोडेखोर आले होते. याच सोसायटी मधील काही बंद फ्लॅट या दरोडेखोरांनी फोडले असून त्यातील रहिवाशी बाहेर गावी असल्याने काही किंमती ऐवज गेल्याचे अद्याप समजले नाही आहे. निवासी परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्या होत असून पोलिसांनी या दरोडेखोरांना पकडून येथील रहिवाशांना दिलासा देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
