कल्याण : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कल्याण पूर्वेतील सिद्धार्थ नगर परिसरातील एका कौलारू चाळीचा काही भाग कोसळून आशाबाई बाळकृष्ण गांगुर्डे या महिला गंभीर जखमी झाल्या. या घटनेमुळे परिसरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले. कल्याण पूर्व येथील सिद्धार्थ नगर परिसरात मुसळधार पावसामुळे आशाबाई बाळकृष्ण गांगुर्डे यांचे राहते घर कोसळून त्या गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच आमदार सुलभा गायकवाड यांच्या सहकाऱ्यांनी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी आशाबाई यांना कोणताही विलंब न करता त्वरित खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करून उपचाराची व्यवस्था करण्यात आली.
