गोदी कामगारांनी वाहिली श्रद्धांजली !
मुंबई : महाराष्ट्र हिंद मजदूर सभेचे खजिनदार, वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉईज युनियनचे खजिनदार तसेच मणिबेन कारा फाउंडेशनचे डेप्युटी डायरेक्टर  विकास गुप्ते यांचे ६ जुलैला वयाच्या ६५  व्या वर्षी  कल्याण येथील रेल्वे हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. विकास गुप्ते हे शेवटच्या श्वासापर्यंत कामगार चळवळीमध्ये सक्रिय होते. आझाद मैदान येथे 3 जुलै रोजी चार कामगार कायदे मागे घ्या, या इतर मागण्यासाठी झालेल्या आंदोलनामध्ये त्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला होता. रेल्वे कामगारांच्या बैठका घेऊन अन्यायाविरुद्ध त्यांनी सातत्याने आवाज उठविला. अभ्यासू कामगार नेते असल्यामुळे वेतन आयोगामध्ये सातत्याने त्यांचा  सक्रिय सहभाग होता. हिंद मजदूर सभेच्या अधिवेशन आणि  कामगार प्रशिक्षण आयोजनामध्ये त्यांचा नियमित सहभाग होता. रेल्वे कामगारांमधील एक अभ्यासू वक्ता म्हणून त्यांचा नावलौकिक होता.  कामगार चळवळीच्या प्रत्येक आंदोलनामध्ये ते सक्रिय होते. रेल्वे व्यवस्थापनासमोर कामगारांची बाजू ते नेहमी ठामपणे मांडत होते. त्यांच्या निधनाने रेल्वे कामगारांचे तसेच कामगार चळवळीचे फार मोठे नुकसान झाले आहे. एका अभ्यासू कामगार नेत्याला कामगार चळवळ मुकली आहे. याची जाणीव नेहमीच कामगार चळवळीला होईल.  विकास गुप्ते यांच्या कुटुंबीयांच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत. त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर देवो. ही प्रार्थना, अशा शब्दांत रेल्वे कामगारांचे नेते विकास गुप्ते यांना मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष  ॲड. एस. के. शेट्ये  आणि जनरल सेक्रेटरी एक मिनिट फक्त सुधाकर अपराज यांनी गोदी  कामगारांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *