महिलेसह चारजण जखमी
मिरा -भाईंदर : काशिमीरा येथील एका निर्माणधीन बिल्डिंगमधून आज बैठ्या चाळीतील घरावर पेवर ब्लॉक कोसळला. यात एका महिलेसह चार जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  पावसाच्या पाण्याने सगळीकडे पाणी भरलेल्ले असताना आज या चाळीवर दुहेरी संकट कोसळले. मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा यामुळे आज सकाळी पेवर ब्लॉक घरावरील पत्र्यावर पडला. पत्रा तोडून आत आलेल्या या ब्लॉकमुळे एका महिलेसह चार जण जखमी झाले. पहाटेच्या झोपेत असल्याने त्यांना सावरता आले नाही. मिरा गावठाण मधील विघ्नहर्ता ही बिल्डिंग निर्माणधीन असून लगतच्या हरिधाम सोसायटीतील चाळीतील घरावर हार्दिक ब्लॉक पडला. बिल्डर तसेच संबंधितांवर निष्काळजीपणाबद्दल कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *