दिनकर पाटील, शंकुतला खटावकर यांना जीवन गौरव
मंगेश वरवडेकर यांना क्रीडा पत्रकार पुरस्कार
मुंबई : मैदानावर कबड्डीपटूंवर अन्याय होताच आपल्या लेखणीला धार देणारे, खेळाडूंचा आवाज दाबताच व्यवस्थेला जाब विचारणारे आणि कबड्डीपटूंच्या हक्कासाठी प्रसंगी व्यवस्थेशी दोन हात करणारे आणि कबड्डीतील अन्यायाविरुद्धचा संताप आपल्या बातम्यांमधून सातत्याने मांडणारे दै. ‘सामना’चे क्रीडा पत्रकार मंगेश वरवडेकर यांच्या लढाऊ पत्रकारितेचा महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने गौरव केला आहे. संघटनेने आपल्या २६ व्या कबड्डी दिनाचे औचित्य साधत त्यांना ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार जाहीर केला असून त्याचबरोबर आपल्या विविध पुरस्कारांचीही घोषणा केली.
तसेच कबड्डीसाठी आयुष्य झिजवणारे दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना प्रतिष्ठेच्या कबड्डी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. ज्येष्ठ खेळाडू, पंच, प्रशिक्षक, कार्यकर्ते, पत्रकार आणि गुणवंत कबड्डीपटूंवर यंदा पुरस्कारांचा अक्षरशः वर्षाव करण्यात आला आहे. येत्या १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात रत्नागिरी जिल्हा कबड्डी संघटनेच्या वतीने हा दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा होणार असल्याची माहिती राज्य कबड्डी संघटनेने पत्रकाद्वारे दिली आहे.
कबड्डी दिन पुरस्कार विजेते
कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवन गौरव पुरस्कार : दिनकर पाटील (सांगली), शकुंतला खटावकर (पुणे).
ज्येष्ठ पत्रकार : मंगेश वरवडेकर (दै. सामना),
अलताफ कडकाले (दै. सकाळ)
ज्येष्ठ कार्यकर्ते पुरस्कार : आत्माराम घेगडे, बंडूकांबळे, भरत मुळे, गिरीश नाईक, डॉ. दत्तात्रय शिंपी, वल्केश राऊत, खंडबाराव नाईक, प्रकाश पाटील, सय्यद अजगर अली पटेल, विलास सावंत.
ज्येष्ठ पंच पुरस्कार : प्रकाश मोरे, रविंद्र लाड, अरुण पवार, अनिल शेजवळ, सूर्यकांत मुटके, वाल्मिक बागुल,मधुकर साळुंखे, हिरामण भोईर, बाळकृष्ण कडूस, रामदास गोळे.
ज्येष्ठ खेळाडू पुरस्कार : सुरेश मोरे, शशिकांत कोरगांवकर, रवींद्र लवेकर,तुळसीदास रोकडे,ब्रह्मनाथ मेंगडे, सुदाम जोगदंड, अलका कारखानीस, मदन गायकवाड, रमेश देवाडीकर स्मृती श्रमयोगी कार्यकर्ता पुरस्कार- दीपक कांदळगांवकर (उपनगर),
डॉ. शिवशंकर कापसे (हिंगोली), अरुणा गावडे (कोल्हापूर)
कृतज्ञता पुरस्कार- निवृत्ती देसाई, सोपान काकडे, सदानंद जोशी, अभिजित राणे.
फिदा कुरेशी स्मरणार्थ ज्येष्ठ प्रशिक्षक- नारायण गायकवाड (ठाणे),सुहास कदम (मुंबई उपनगर)
किशोर व कुमार गट शिष्यवृत्ती विजेते
किशोर गट : सुरज राठोड (रत्नागिरी), प्रशांत अकीगे (कोल्हापूर), ध्रुव डोंगरे (पालघर).
किशोरी गट : आरती खांडेकर (पुणे), सेजल काकडे (नाशिक), ज्ञानेश्वरी ढवण (अहिल्यानगर), कुमार गट : शुभम बिटके (पुणे), जीतसिंग सैनी (ठाणे), अतुल जाधव (परभणी). कुमारी गट : संजना भोईर (पालघर), वैभवी जाधव (पुणे), सानिका पाटील(सांगली).
किशोर- किशोरी गट शिष्यवृत्ती : दिपराज कांबळे (परभणी), मैत्री इंगळे (सातारा)
सर्वोत्कृष्ट चढाईपटू पुरस्कार : सौरभ राऊत (अहिल्यानगर), यामिका पुजारी (मुंबई उपनगर)
उत्कृष्ट कबड्डीपटू पुरस्कार : शिवम पठारे, (अहिल्यानगर), निकिता पडवळ (पुणे).
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत हिंदुस्थानचे प्रतिनिधीत्व
कुमार गट : प्रसाद दिलीप (पुणे)
कुमारी गट : सेरेना म्हस्कर (मुंबई उपनगर
प्रथम जिल्हा संघ पुरस्कार : अहिल्यानगर जिल्हा कबड्डी संघटना
उत्कृष्ट स्पर्धा आयोजक जिल्हा : नाशिक जिल्हा कबड्डी संघटना व सह्याद्री युवा मंच सिन्नर, नाशिक
००००
