वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अभियानांतर्गत लावण्यात आली १५०० झाडे
कल्याण : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या तर्फे व पद्मडॉ. दत्तात्रय धर्माधिकारी आणि डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृती दिनानिमित्त कल्याण पूर्वेतील भाल टेकडी, भाल क्रिकेट मैदान, भाल गांव याठिकाणी  वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अभियान राबविण्यात आले. या अभियाना अंतर्गत एकूण १५०० झाडे लावण्यात आली. या अभियाना अंतर्गत प्रामुख्याने दीर्घायुषी व जास्त ऑक्सिजन देणाऱ्या भारतीय वृक्षांची लागवड केली आहे. या झाडांमुळे परिसरातील जैवविविधता वाढण्यास मदत होईल.
अभियानास केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, उद्यान निरीक्षक तथा उपायुक्त संजय जाधव, बदलापूर वनविभाग अधिकारी संजय धारवणे, राजू शिंदे, वैभव वाळिंबे, वृक्ष प्राधिकरण समिती अध्यक्ष तथा नगरसेवक किरण भांगले, कल्याण वनविभाग अधिकारी निलेश आखाडे, आमदार राजेश मोरे, माजी आमदार नरेंद्र पवार, स्थानिक नगरसेवक निलेश खंबायत, कैलाश जोशी, पल्लवी जोशी, स्वप्नाली केणे, आकांक्षा भोईर, माजी नगरसेवक प्रकाश तरे, जगदीश तरे, मनविसे कल्याण शहर अध्यक्ष विनोद केणे तसेच भाल गावातील नागरिक, श्रीसदस्य, लोकप्रतिनिधी यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *