मुंबई : नुकतेच नागपूर येथे आयोजित महाराष्ट्र एअर गन शूटिंग स्पर्धेतील (ISSF Events) सामने यशस्वीरित्या पार पडले.प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातील PTKS शूटिंग रेंजच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत भरभरून पदके पटकावली आहेत. १० मीटर एअर रायफल पुरुष गटात निमेश एस. जाधव याने सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. १० मीटर एअर रायफल महिला गट सज्जाता गुप्ता हिने रौप्यपदक पटकावले तर अंशिका आर. चोखाणी हिने कांस्यपदक जिंकले. प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातील सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे, त्यांच्या पालकांचे व प्रशिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.
