ठाणे : स्वमालकीच्याअनधिकृत बांधकामात बेकायदेशीरपणे  नळ जोडणी करणाऱ्या कंत्राटदाराच्या कंपनी, कामाबाबत माहितीच्या अधिकारात थातूर मातुर उत्तरे देणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांविरोधात काय कारवाई करणार असा उदिग्न सवाल ही माहिती मागवणाऱ्या गौतम मोरे यांनी केला आहे. ठाणे महापालिकेचे कंत्राटदार असलेल्या गणेश टाक (सुयश इन्फ्रा प्रोजेक्ट )याने येऊरमधील वन विभाग शेणाचा पाडा येथील भूमापन क्र न स ७ उपविभाग १५(७/१७) या १० गुंठे जागेवर हेरंब पार्क नावाचे अनधिकृत फॉर्म हाऊस उभारले. हे अनधिकृत बांधकाम उभारणाऱ्या गणेश टाक याने बेकायदेशीर नळ जोडणीही केली आहे. यासंदर्भात गौतम मोरे यांनी, स्वतःच्या अनधिकृत बांधकाम असलेल्या हेरंब फार्म मध्ये नळ जोडणी करणाऱ्या गणेश टाक याच्या कंपनीबाबत त्यांनी मागील तीन वर्षात ठाणे महापालिकेची केलेली कामे, कंपनीची सत्यता, कंपनीतील एकूण कामगार, त्या कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीबाबत माहिती मागवणारा २० फेब्रुवारीला  पहिला माहिती अधिकाराचा अर्ज दाखल केला होता. या अर्जाची दखल घेऊन ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अतुल कुलकर्णी यांनी उत्तर दिले. पण कुलकर्णी यांनी दिलेली माहिती अर्धवट असल्याचे वाटल्याने गौतम मोरे यांनी पुन्हा २२ एप्रिलला दुसरा माहितीचा अर्ज दाखल केला. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता संजय शेटे यांनी दिलेले उत्तरही अर्धवट असल्याचे गौतम मोरे यांनी सांगितले.  कंत्राटदार असलेल्या गणेश टाक याच्या कंपनीबाबत माहिती देताना त्याठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची संख्या,त्यांची नावे, त्यांच्या भविष्य निर्वाह निधीबाबत कसलीच माहिती दिली नाही आणि त्याबाबत कसलेच स्पष्टीकरणही दिले नाही असे गोतम मोरे म्हणाले. हेरंब फॉर्मच्या बांधकामात आमच्या कडे कसलीच माहिती नसल्याचे ठाणे महापालिका आणि वन विभागाने लिहून दिले आहे. असे असताना अर्धवट माहिती देऊन महापालिकेचे अधिकारी अनधिकृत बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराला पाठीशी का घालत आहे असा सवाल गौतम मोरे यांनी केला आहे. या अनधिकृत बांधकाम आणि ते करणाऱ्या कंत्राटदाराविरुद्ध कारवाई न झाल्यास उच्चस्तरीय अधिकाऱ्याकडे प्रसंगी कोकण विभागीय आयुक्तांकडे दाद मागणार असल्याचे गौतम मोरे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *