आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ
सुनिल इंगळे
उल्हासनगर : उल्हासनगर येथील सपना गार्डन परिसरातील पार्किंग क्षेत्राकडे जाणारा मार्ग अनेक दिवसांपासून अत्यंत जर्जर अवस्थेत असल्याने स्थानिक नागरिक तसेच वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात या मार्गावर खड्डे, चिखल आणि पाणी साचत असल्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत होते. नागरिकांकडून वारंवार करण्यात येणाऱ्या मागणीची दखल घेत आमदार कुमार आयलानी यांच्या प्रयत्नातून या मार्गाचे सिमेंट काँक्रीट (सीसी) रस्त्यात रूपांतर करण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
या विकासकामामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, पार्किंग परिसरातील वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत होणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. सीसी रस्ता पूर्ण झाल्यानंतर वाहनधारकांना खड्डे, चिखल आणि पावसाळ्यातील गैरसोयींना सामोरे जावे लागणार नाही, तसेच नागरिकांना दैनंदिन ये-जा अधिक सोयीस्कर होईल. यावेळी उपस्थित नागरिकांनी आमदार कुमार आयलानी यांचे मनःपूर्वक आभार मानले. या मार्गाच्या दुरुस्तीची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. अखेर या कामाला सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
स्थानिक नागरिक नरेश मुलचंदानी यांच्यासह परिसरातील मान्यवरांनी आमदार कुमार आयलानी यांच्या जनहिताभिमुख कार्याचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले. नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विकासकामे राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. यापुढेही अशाच प्रकारे मूलभूत सुविधांशी संबंधित विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला. या कामामुळे उल्हासनगर शहरातील पायाभूत सुविधांमध्ये आणखी सुधारणा होऊन नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *