अनिल ठाणेकर
ठाणे, जनमत न घेता नागरी वस्तीमध्ये उभारण्यात येत असलेल्या डेटा सेंटरविरोधातील ठाणेकरांचा संताप आता रस्त्यावर दिसणार आहे. वेक अप ठाणेकर या संघटनेच्या पुढाकाराने शनिवारी सकाळी १० वाजता प्रस्तावित डेटा सेंटरच्या भूखंडासमोर, बाळकूम येथे निदर्शने करण्यात येणार आहेत. पूर्णपणे अराजकीय असलेल्या या आंदोलनात हजारो ठाणेकर सहभागी होणार आहेत, अशी माहिती वेक अप ठाणेकर या संस्थेच्या वतीने देण्यात आली.
बाळकूम येथील ५३ एकर भूखंडावर अद्ययावत डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे. या डेटा सेंटरसाठी दररोज १२ दशलक्ष लिटर्स शुद्ध पाणी आणि अमर्याद विजेचा पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच, या डेटा सेंटरमधून वर्षाचे ३६५ दिवस, दिवसाचे २४ तास ९० डिसेबल आवाज परिसरात गुंजत राहणार आहे. या आवाजाचा दुष्परिणाम गर्भवती  महिला, लहान मुले आणि वृद्धांना सहन करावा लागणार आहे.  युरोप अमेरिकेतून हद्दपार केलेला हा प्रकल्प ठाण्यात आणण्यामागे नक्की कारण काय आहे, असा सवाल करून या प्रकल्पाविरोधात शनिवारी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय ठाणेकरांनी घेतला आहे, असे वेक अप ठाणेकरचे दयानंद नेने, साधनाताई प्रधान,  राजेश कदम, मेघना शेट्टी, हिमानी वर्मा, जतीन कोठारे,  गुरासिस बुमरा, लावण्या पाटील यांनी सांगितले. शनिवारी सकाळी १०.०० वाजता कल्पतरू, बाळकूम येथील डेटा सेंटरबाहेर परिसरातील नागरिक निदर्शने करणार आहेत. या आंदोलनात किमान १ हजार नागरिक सहभागी होतील, असे वेक अप ठाणेकरच्या वतीने सांगण्यात आले.
०००००००००००
००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *