अमित ठाकरे यांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ
मुंबई, दि. २6 जुलै -महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्रमांक ११७ आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, विक्रोळी विधानसभा यांच्या संयुक्त विद्यमाने विभागातील सुमारे १,००० शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्या शुभहस्ते झाले.
यावेळी विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग ११७ चे शाखाध्यक्ष तथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना विक्रोळी विधानसभा विभागाध्यक्ष ॲड. प्रथमेश कृष्णा धुरी आणि प्रेरणा शिक्षण सहाय्यक संस्थेचे संस्थापक उमेश मोरे यांनी केले होते. या कार्यक्रमाला विक्रोळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील (भाऊ) राऊत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनीही स्वागत केले.
हा उपक्रम कै. विमल मेहेरा व कै. आशा मेहेरा यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आला. तसेच कॉलिटी फ्रुट्स, वाशीचे नागेश सिद्धाप्पा नवलगुंड, सुपरडोन इलेक्ट्रिकल्स प्रायव्हेट लिमिटेडचे भावेश शहा (अंधेरी), दिलीप प्रशांद (अंधेरी) आणि धनवंत शहा (दादर) यांच्या सहकार्यामुळे हा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मनापासून अभ्यास करून उज्ज्वल भवितव्य घडविण्याचे आवाहन केले, तर आयोजकांनी भविष्यातही अशा शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *