मंुबई : महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने चेंबूर जिमखाना येथे सुरु असलेल्या चेंबूर जिमखाना ५ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या उप उपांत्य फेरीत मुंबईच्या राहुल सोलंकीने मुंबईच्या ओंकार टिळकला २५-५, १९-१४ असे सहज हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर दुसरीकडे ठाण्याच्या पंकज पवारने ठाण्याच्या झैद अहमद फारुकीवर पहिला सेट २१-२२ असा गमावूनही दुसरा व तिसरा सेट १७-१२ व २५-० असा जिंकून उपांत्य फेरी गाठली. महिला एकेरीच्या उप उपांत्य लढतीत रत्नागिरीच्या आकांक्षा कदमने मुंबईच्या सोनाली कुमारीला ४-२३, २५-१० व २२-११ असे तीन सेटच्या झुंजीनंतर पराभूत करून उपांत्य फेरी गाठली. तर दुसऱ्या उप उपांत्य लढतीत ठाण्याच्या मधुरा देवळेने ठाण्याच्या चैताली सुवारेला २१-१६, २१-१० असे सरळ दोन सेटमध्ये चीत करून आगेकूच केली.
पुरुष एकेरी उप उपांत्य फेरीचे इतर निकाल पुढील प्रमाणे.
संजय मांडे ( ठाणे ) वि वि कुणाल राऊत ( ठाणे ) २३-१६, १४-१३
प्रशांत मोरे ( मुंबई ) वि वि महम्मद घुफ्रान ( मुंबई ) २४-१४, १६-२
महिला एकेरी उप उपांत्य फेरीचे इतर निकाल पुढील प्रमाणे.
प्राजक्ता नारायणकर ( मुंबई ) वि वि श्रुती सोनावणे ( पालघर ) २५-३, १९-१८
मैत्रीयी गोगटे ( मुंबई ) वि वि केशर निर्गुण ( सिंधुदुर्ग ) २३-१९, १६-२५ व २५-६
००००००००००
