कल्याण: स्मार्ट मीटर संदर्भात असलेले गैरसमज दूर करून त्याचे महत्त्व वीज ग्राहकांना पटवून देण्यासाठी महावितरण कडून गृहसंकुलात थेट वीज ग्राहकांच्या दारात त्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यास सुरुवात केली आहे. महावितरणच्या कल्याण पूर्व विभागात येणाऱ्या कासा गोल्ड आणि कासा रिओ या दोन गृह संकुलात रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून येथील सुमारे ५०० वीज ग्राहकांना स्मार्ट मीटरचे प्रात्यक्षिक दाखविले. कासार रिओ गृह संकुलाचे पदाधिकारी योगेश पाटील, मनिष मामनिया, कासा गोल्डचे समिर कोंढाळकर, निवृती पाटील यांनी या कामी पुढाकार घेतला होता. यावेळी ग्राहकांचे विविध प्रश्न व तक्रारी समजून घेत त्यावर उत्तरे देण्यात आली.
स्मार्ट मिटर महा विद्युत एँप द्वारे रिअल टाईम विज वापर कसा पहायचा याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. उपस्थित ग्राहकांना एँप ईनस्टॉल करण्याकरीता सहाय्य केले. विविध विज उपकरणे व त्यांच्या विज वापराबाबत माहिती देण्यात आली. तथापि, ग्राहकांनी स्मार्ट मीटर बद्दल ग्राहकांच्या विज वापरायच्या तफावतीच्या बाबतची शंका दूर करण्याकरीता तक्रारी नुसार मिटर चाचणी करणेची मागणी केली. ग्राहकांच्या मागणीनुसार सिरीज मिटर द्वारे मिटर तपासणी करण्याचे आश्वासन देण्यात आले. सदर बैठकीस महावितरण कडून नितीन अंबाडकर अतिरिक्त कार्यकारी अभियंता देयके व महसूल कल्याण पूर्व उपविभाग -२ , गणेश वग्रे सहाय्यक अभियंता देयक व महसुल तसेच संचलन व सुव्यवस्था तसेच देयक व महसुल उप विभागातील लिपिक व कर्मचारी उपस्थित होते.
0000
