मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर सत्कार
दिवा, दि. ४ ऑगस्ट : ठाणे महानगरपालिकेच्या दिवा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दिपक नामदेव जाधव यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत नागरिकांच्या अपेक्षेनुसार विकास कामांना गती देण्याचा विश्वास व्यक्त केला. या सत्कार समारंभाला कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश गोवर्धन मोरे, आमदार रवी फाटक, ठाण्याच्या महापौर शर्मिलाताई पिंपळकर, मीनाक्षीताई शिंदे तसेच दिवा शहर प्रमुख, नगरसेवक रमाकांत मढवी यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपक जाधव यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी “विश्वासाची ही जबाबदारी, सेवाभावाची ही नवी संधी” या भावनेतून जनतेच्या अपेक्षांना न्याय देत दिवा परिसराच्या विकासाला नवी दिशा देण्याचे आवाहन करण्यात आले. नागरिकाभिमुख प्रशासन, मूलभूत सुविधा आणि प्रभागातील विकासकामांना प्राधान्य देत काम करण्याचा विश्वासही व्यक्त करण्यात आला. दरम्यान, कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश गोवर्धन मोरे यांनीही दिपक जाधव यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दिवा प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी काम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
