कल्याण: ठाणे जिल्हा राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका व सर्व तालुक्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन क्रीडा शिक्षकांची सर्वसाधारण सभा रविवार ९ ऑगस्ट, सकाळी ११ ठाणे भारत स्काऊट व गाईड जिल्हा कार्यालय, टी.एम.टी बस स्टॉप, गावदेवी मंदिराच्या बाजूला, ठाणे पश्चिम येथे आयोजित केलेली आहे.
या सभेला महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ, पुणे चे राज्याध्यक्ष शरदचंद्र धारुरकर, राज्य सचिव चांगदेव पिंगळे व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या सर्वसाधारण सभेत ठाणे जिल्ह्याची कार्यकारिणी नव्याने तयार करण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त क्रीडा शिक्षकांनी सभेला उपस्थित रहावे असे आवाहन मुंबई विभाग सचिव अंकुर आहेर यांनी केले आहे. क्रीडा शिक्षकांनी ८४२२९१९६१२ या नंबरवर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *