कल्याण:  इंद्रायणी शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष तसेच कला, वाणिज्य आणि विज्ञान विभागांच्या संयुक्त विद्यमाने “युवा सक्षमीकरण आणि करिअर: आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन” या विषयावरील आंतरराष्ट्रीय वेबिनारचे आयोजन संमिश्र पद्धतीने नुकतेच करण्यात आले.
महाविद्यालयाच्या परिषद सभागृहात आयोजित या वेबिनारमध्ये १०० हून अधिक विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञांनी प्रत्यक्ष तसेच ऑनलाइन सहभाग नोंदविला. परदेशातील सहभागींच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले.
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. लीना गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या वेबिनारमध्ये डॉ. इनिबेहे जॉर्ज उकपोंग, कृषी विस्तार व व्यवस्थापन विभाग, फेडरल पॉलिटेक्निक, एकोवे, बायल्सा स्टेट, नायजेरिया यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी युवकांचे सक्षमीकरण, गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्य विकास, उद्योजकता, नेतृत्वगुण, नवोपक्रम आणि जागतिक संधी यांवर सखोल मार्गदर्शन केले. बदलत्या जागतिक रोजगार बाजारपेठेत यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी डिजिटल कौशल्ये, सातत्याने शिकण्याची वृत्ती आणि जागतिक दृष्टीकोन विकसित करण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी करिअर, उच्च शिक्षण, उद्योजकता आणि आंतरराष्ट्रीय संधींबाबत विविध प्रश्न विचारून मार्गदर्शन मिळविले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी IQAC समन्वयक प्रा. सोनम चव्हाण यांच्या नियोजनबद्ध नेतृत्वाचे विशेष कौतुक करण्यात आले.  श्रेयसी उपाध्याय (एस.वाय.बी.एस्सी.) हिने कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले. प्रा. सायली म्हात्रे, प्रा. जयवंत मोरे, प्रा. दिनेश धनगर आणि पंकज चन्ने यांनी कार्यक्रम समन्वयाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. तसेच प्रज्ञा पाटील आणि प्रा. उल्हास गायकर यांनी कार्यक्रम व्यवस्थापनात मोलाचे योगदान दिले.
इंद्रायणी शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. विलास गायकर यांनी प्राचार्या तसेच सर्व अध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उत्कृष्ट नियोजन व परिश्रमांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व जागतिक स्तरावरील संधी उपलब्ध करून देण्यासाठी भविष्यातही अशाच दर्जेदार आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचा समारोप प्रा. सचिन कांबळे यांनी आभार प्रदर्शनाने केला. कार्यक्रमातील सर्व नोंदणीकृत सहभागीांना ई-प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. देश-विदेशातील सहभागींनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा आंतरराष्ट्रीय वेबिनार अत्यंत यशस्वी ठरला.
००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *