अशोक गायकवाड
मुंबई : ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज महाराष्ट्र लोकभवन, मुंबई येथे हाती राष्ट्रीय ध्वज घेऊन राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत व राज्य गीत गायले. राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे तसेच इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत राज्यात साजरा केल्या जात असलेल्या ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा भाग म्हणून तसेच ‘वंदे मातरम’ या गीताला १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोक भवनातील दरबार हॉल, जल विहार यांसह इतर ऐतिहासिक महत्वाच्या इमारतींवर राष्ट्रध्वज लावण्यात आला.
००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *