आदिती तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे विशेष प्रयत्न
अशोक गायकवाड
रायगड-लिबाग : राज्याच्या महिला व बाल विकास मंत्रीआदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील दत्तक प्रक्रिया अधिक गतिमान, पारदर्शक आणि परिणामकारक करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार रायगड जिल्हा प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत दत्तक प्रक्रियेला गती दिली आहे. दत्तक ग्रहण नियमावली, २०२२ अंतर्गत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा बाल संरक्षण समिती, रायगड किशन जावळे यांच्या परवानगीने जिल्ह्यातील तीन दत्तक प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये दोन संस्थात्मक दत्तक प्रकरणे असून संस्थेतील बालकांना कायदेशीररित्या कायमस्वरूपी कुटुंब उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच एक नात्यांतर्गत दत्तक प्रकरण मंजूर करण्यात आले आहे. या निर्णयामुळे तीन बालकांना सुरक्षित, प्रेमळ व कायमस्वरूपी कुटुंबाचा आधार मिळाला आहे. ही संपूर्ण प्रक्रिया जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, संबंधित विशेष दत्तक संस्था तसेच केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण यांच्या समन्वयातून या ऑनलाइन प्रणालीद्वारे पारदर्शक आणि नियमानुसार पूर्ण करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, महिला व बालविकास मंत्री यांच्या निर्देशानुसार प्रलंबित दत्तक प्रकरणे तातडीने निकाली काढण्यास प्राधान्य देण्यात येईल. प्रत्येक निराधार बालकाला सुरक्षित, प्रेमळ आणि कायमस्वरूपी कुटुंब मिळावे, यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून दत्तक प्रक्रियेला अधिक गती दिली जाईल.दत्तक प्रक्रिया ही निराधार बालकांच्या पुनर्वसनासाठी अत्यंत महत्त्वाची असून समाजातील पात्र व इच्छुक दाम्पत्यांनी शासनाच्या अधिकृत प्रक्रियेद्वारे दत्तक घेण्यास पुढाकार घ्यावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे. इच्छुक दाम्पत्यांनी अधिकृत दत्तक प्रक्रियेसाठी नोंदणी करावी • पात्र व इच्छुक दाम्पत्यांनी अधिकृत दत्तक प्रक्रियेचा अवलंब करून निराधार बालकांना प्रेमळ व सुरक्षित कुटुंबाचा आधार द्यावा असे आवाहन महिला व बाल विकास विभागामार्फत करण्यात आले आहे. • दत्तक प्रक्रियेसाठी नोंदणी : https://cara.wcd.gov.in/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *