मिरा -भाईंदर
चेकनाक्याजवळ सोमवारी दुपारी एका भरधाव सिमेंट मिक्सर ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात १४ वर्षीय शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झाला असून त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. सौरभ विश्वकर्मा असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अवजड वाहनांच्या बेफिकीर वाहतुकीबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. सौरभ विश्वकर्मा हा शाळा सुटल्यानंतर वडिलांसोबत दुचाकीवरून जात होता. दुपारी एकच्या सुमारास त्यांची दुचाकी दहिसर चेकनाक्याजवळील गोदावरी लॉजसमोर आली असता, पाठीमागून वेगाने आलेल्या एका सिमेंट मिक्सर ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
