७० मूर्तींचे विधीवत विसर्जन
दिवा: गुजराती विकास मंडळ, दिवाच्या अध्यक्षा तसेच मुंबई मेघवाळ पंचायत, दिवा विभाग क्रमांक ७० च्या महामंत्री मीनूबेन गोहिल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्व. अशोक सोलंकी यांच्या प्रेरणेतून गणेशनगर तलाव, आगासन रोड, दिवा येथे दशामाता माताजींच्या विसर्जनाचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. दशामाता माताजींचे दर्शन आणि विसर्जनासाठी दिव्यासह डोंबिवली परिसरातूनही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. यावेळी अंदाजे ७० दशामाता माताजींच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. भाविकांसाठी चहा, पाणी, गरबा तसेच बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गुजराती विकास मंडळाच्या सर्व कमिटी सदस्यांनी रात्रभर उपस्थित राहून भाविकांची सेवा केली आणि संपूर्ण कार्यक्रमाची व्यवस्था सुरळीत ठेवली.
धीरज वालेरा आणि अमृत खिमोरिया यांनी संपूर्ण रात्र मूर्ती विसर्जनाच्या कार्यात तसेच भाविकांच्या सेवेत योगदान दिले. विशाल सोलंकी, ध्रुव पडाया, नयन परमार, प्रशांत वालेरा, मेहुल वालेरा, पिनाक वोरा, अजित सिंह, सुरेश मोहित यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी रात्रभर सेवा बजावली. यावेळी काही भाविकांनी आयोजकांच्या व्यवस्थेचे कौतुक केले. “आम्ही यापूर्वी खर्डी गाव येथे विसर्जनासाठी जाणार होतो; मात्र येथे गुजराती विकास मंडळाचे बॅनर पाहिल्यानंतर येथेच विसर्जन करण्याचा निर्णय घेतला. येथे अतिशय सुंदर आयोजन आणि व्यवस्था करण्यात आली आहे,” अशी प्रतिक्रिया भाविकांनी दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिनेश म्हात्रे (TMC), सचिन (TMC) आणि शंभूराव पाटील यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. तसेच TMCच्या संपूर्ण टीमने सुरक्षा, स्वच्छता आणि व्यवस्थापनासाठी सहकार्य केले. दिवा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनीही संपूर्ण रात्र सुरक्षा व्यवस्था राखत कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य केले. दशामाता विसर्जनाचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुजराती विकास मंडळ, दिवाचे सर्व सदस्य, सेवाभावी कार्यकर्ते, भाविक भक्त आणि सहकार्य करणाऱ्या सर्व व्यक्तींचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.
0000
