ठाणे : २६ ऑगस्ट धर्मवीर आनंद दिघे यांच्या २५ व्या पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आनंद चित्र कथा’ स्पर्धा संपन्न झाली याचे आयोजन बारटक्के फाऊंडेशन आणि येवनेट मल्टिमीडिया प्रा. लि आणि विविध सहयोगी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे महापालिका, येथे केले होते.
मुख्य प्रवेशद्वाराजवळ जतन केलेली आठवण साहेबांची आर्माडा जीप गाडी महाराष्ट्र-०५-जी-२०१३ व परीक्षकांनी निवडलेल्या उत्कृष्ट चित्राचे प्रदर्शन ‘आनंद चित्र कथाचे उदघाटन आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांमध्ये कला, सर्जनशीलता आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची, गुणांची ओळख निर्माण करण्याच्या उद्देशाने इयत्ता के जी ते इयत्ता
१० वी ते महाविद्यालय पर्यंत राज्यातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील, शहरातील शासकीय, महापालिका शाळा, खाजगी शाळा आणिइतर शाळा आणि कला महाविद्यालयातील तब्बल २५ हजार विद्यार्थ्यांच्या सहभागातून ‘आनंद चित्रकथा’ संपन्न झाली आहे. चित्रकलेच्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्याची आणि सामाजिक योगदानाची ओळख नव्या पिढीला घरोघरी आणि शाळा शाळात झाली आहे.
खासदार नरेश म्हस्के, आमदार रविंद्र फाटक, ठाणे महापौर शर्मिला पिंपळोलकर, शिवसेना गट नेते पवन कदम,ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे अध्यक्ष अरुण पाटील, धर्मवीर चित्रपटाचे निर्माते अभिनेते मंगेश देसाई ठाणे पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे अशोक वैती,राजेश मोरे ,राजन साप्ते आदी मान्यवरांच्या हस्ते ., स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे, कला शिक्षक कला व उद्योग क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व शंकर देसाई आणि अप्पा तथा चंद्रशेखर त्र्यंबक महाशब्दे यांना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जीवनगौरव पुरस्कार २०२६ देऊन सन्मानित करण्यात आले . तर किशोर नादावडेकर आणि प्रशांत सकपाळ यांना धर्मवीर श्री आनंद दिघे विशेष योगदान पुरस्कार २०२६ देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्तविक दिलीप बारटक्के नगरसेवक, ठाणे महानगरपालिका,अध्यक्ष, बारटक्के फाऊंडेशन यांनी तर सूत्रसंचालन राजेंद्र पाटणकर यांनी केले.
