अपर जिल्हाधिकारी सचिन ढोले यांची माहिती
रायगड-लिबाग : अशोक गायकवाड महसूल विभागातील प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे तडजोडीने व जलदगतीने निकाली काढण्यासाठी १ सप्टेंबर ते ३१ मार्च या कालावधीत महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी सचिन ढोले यांनी दिली. महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त हे अभियान आयोजित करण्यात आले आहे. मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये जमिनीशी संबंधित अनेक महसुली दावे प्रलंबित आहेत. लोक अदालतीच्या धर्तीवर दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने व तडजोडीने या दाव्यांचा कायमस्वरूपी निपटारा करण्यात येणार आहे. त्यामुळे अर्धन्यायिक यंत्रणेवरील ताण कमी होऊन पक्षकारांचा वेळ व खर्च वाचणार आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *