मुंबई : ‘द नर्चरिंग रूट्स’ या नर्सरी शाळेच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त राबविण्यात आलेल्या उपक्रमातून जमा झालेली रक्कम आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री मदत निधीत जमा करण्यात आली. या उपक्रमाला पालक आणि चिमुकल्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी जपली. मुलांमध्ये दया, करुणा, सहकार्य आणि समाजासाठी योगदान देण्याची भावना निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे ‘द नर्चरिंग रूट्स’च्या टीमने सांगितले.
००००००
