रमेश औताडे
मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात आर्टी यांच्या वतीने अण्णाभाऊंच्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध प्रशिक्षण उपक्रमांची माहिती देणाऱ्या मोफत माहिती पुस्तिकांचे वाटप तसेच मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महापौर डिंपल मेहता, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे, मातंग समाजाच्या नेत्या कुसुमताई गोपले, तसेच अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आकाश गोडांबे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मिरा-भाईंदर महानगरपालिका आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ही जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रकाश साठे यांनी मार्गदर्शन केले तर सूत्रसंचालन  राजू मानकर यांनी केले. अण्णाभाऊंचे साहित्य, विचार आणि वंचित घटकासाठी दिलेले योगदान याचे स्मरण यावेळी करण्यात आले.
०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *