केतन खेडेकर
मुंबई : शिवसेना वरळी विभागप्रमुख दत्ता नरवणकर आणि विधानसभा प्रमुख प्रशांत गवस यांच्या वतीने वरळी गांधी नगर येथे दहीहंडी सराव शिबिरचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला सर्व गोविंदा पथकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सराव शिबिराचे खास वैशिष्ट्य असे की या शिबिरामध्ये अंध गोविंदाने उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन या ठिकाणी आपले थराचे मनोरे रचले. अंध बांधवांचे सराव शिबिर पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या शिबिरात अंध बांधवांनी यशस्वी मनोरे रचल्यावर अंध बांधवांना आयोजक विधानसभा प्रमुख प्रशांत गवस यांच्या वतीने उत्कृष्ट पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
या सराव शिबिराला *विधानपरिषद उपसभापती सचिनभाऊ अहिर, खासदार मिलिंद देवरा, माजी नगरसेवक श्री सुनीलभाऊ अहिर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी शिवसेना वरळी विधानसभा वैद्यकीय मदत कक्षाच्या विभाग प्रमुख पूजा बारिया यांनी विशेष मेहनत घेतली.
गोविंदा पथकांच्या उत्साहाला प्रोत्साहन देत, एकजुटीची आणि जल्लोषाची भावना अधिक बळकट व्हावी. त्याचप्रमाणे आपले सण आणि संस्कृती जपावी या उद्देशाने आम्ही या दहीहंडी सराव शिबिराचे आयोजन केले असून यापुढे देखील असे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात असल्याची माहिती शिवसेना वय विधानसभा विभाग प्रमुख दत्ता नरवणकर आणि विधानसभा संघटक प्रशांत गवस यांनी दिली.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *