मुंबई : परिवर्तन इंडिया फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष पांडे यांनी परिवर्तन दहीहंडीचे आयोजन शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ सकाळी ११ ते रात्री १० वा. पर्यंत
जांबोरी मैदान, वरळी (मुंबई) येथे केले आहे. या दहीहंडीमध्ये भाग घेण्यासाठी क्यू आर कोडची व्यवस्था करण्यात आली असून या क्यू आर कोंडला स्कॅन केल्यावर आपण फॉर्म भरून या परिवर्तन दहीहंडीमध्ये आपण सहभागी होऊ शकता. मराठी संस्कृती जपणे आणि आपले पारंपरिक सण साजरे करणे आपला अभिमान आहे. ही संस्कृती जोपासण्यासाठी आम्ही या दहीहंडीचे आयोजन केले असून सर्व गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने या दहीहंडीत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक, अध्यक्ष संतोष पांडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *