मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद व निवडचाचणी बॅडमिंटन स्पर्धा
मुंबई, ३ सप्टेंबर : गोरेगाव स्पोर्ट्स क्लब आणि बॅडमिंटन असोसिएशन फॉर मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबई उपनगर जिल्हा अजिंक्यपद व निवडचाचणी बॅडमिंटन स्पर्धेत (२०२६) १३ वर्षांखालील मुलींच्या गटात राऊंड ऑफ १६ फेरीत अव्वल मानांकित हेजल जोशीने शनाया बन्सल १५-४, १५-२ असा सहज विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात लिओरा डिसिल्वाने सायना सावला हिला १५-8, १५-8 असे हरवले. गोरेगाव स्पोर्ट्स क्लब येथे खेळवण्यात येत असलेल्या स्पर्धेत १३ वर्षांखालील मुलांच्या राऊंड ऑफ १६ फेरीमध्ये चित्तेश राझदानने झियान घिया याच्यावर ११-१५, १५-१३, १५-९ अशी मात केली.
निकाल – १३ वर्षांखालील मुली (राऊंड ऑफ १६ फेरी): हेजल जोशी विजयी वि. शनाया बन्सल १५-४, १५-२; रिदा सिद्दीकी विजयी वि. आराध्या दळवी १५-२, १५-०; निकिता गौतम विजयी वि. नितारा जैन १५-३, १५-०; रिशा पटेल विजयी वि. टियाना भानुशाली १५-१२, १५-६; लिओरा डिसिल्वा विजयी वि. सायना सावला १५-8, १५-8; मायरा गोराडिया विजयी वि. शनाया पै १५-६, १५-१३; अनन्या जैस्वाल विजयी वि.अनया शेठ १५-९, १५-३.
१३ वर्षांखालील मुले (राऊंड ऑफ १६ फेरी): अजिंक्य देसाई विजयी वि. विराज सिंग १५-६, १५-७; देवांश पांडे विजयी वि. निर्वाण शहा १५-५, १५-8; चित्तेश राझदान विजयी वि. झियान घिया ११-१५, १५-१३, १५-९; रेयांश कुमार विजयी वि. निहित रहाळकर १५-४, १५-७.
००००
