बॉम्बे जिमखाना महाराष्ट्र राज्य खुली स्क्वॉश स्पर्धा
मुंबई, ३ सप्टेंबर: ४९व्या बॉम्बे जिमखाना महाराष्ट्र राज्य खुल्या स्क्वॉश स्पर्धेत पुरुष आणि महिला गटामध्ये दुसरा मानांकित राहुल बैठा आणि तिसरी मानांकित रथिका सीलन हिने अनुक्रमे पुरुष आणि महिला गटाचे विजेतेपद पटकावले. बॉम्बे जिमखाना ग्लासबॅक कोर्टवर सुरू असलेल्या स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत गुरुवारी दुसऱ्या सीडेड राहुल बैठाने टॉप सीडेड ओम सेमवालवर चुरशीच्या लढतीत २-११, ११-७, ३-११, ११-५, ११-७ असा विजय मिळवला. तीन गेमनंतर राहुल हा १-२ असा पिछाडीवर होता. मात्र, शेवटचे दोन गेम जिंकत त्याने जेतेपदाला गवसणी घातली. महिला एकेरीच्या एकतर्फी फायनलमध्ये तिसऱ्या/चौथ्या मानांकित रथिका सुथंथिरा सीलन हिने दुसऱ्या सीडेड आकांक्षा साळुंखेचा ११-५, ११-३, ११-३ असा सरळ गेममध्ये पराभव केला.
१९ वर्षांखालील मुलांमध्ये टॉप सीडेड पुरव रांभियाने अगस्त्य बन्सलला ११-१, ११-३, ११-२ असे सहज हरवले. मुलींच्या गटात अव्वल मानांकित आकांक्षा गुप्ताने दुसऱ्या मानांकित व्योमिका खंडेलवालवर ११-४, ११-४, ११-२ अशी सहज मात करत केली.
निकाल (सर्व अंतिम फेरी): १९ वर्षांखालील मुली: आकांक्षा गुप्ता विजयी वि. व्योमिका खंडेलवाल ११-४, ११-४, ११-२.
१९ वर्षांखालील मुले: पुरव रांभिया विजयी वि. अगस्त्य बन्सल ११-१, ११-३, ११-२.
महिला: रथिका सुथंथिरा सीलन विजयी वि. आकांक्षा साळुंखे ११-५, ११-३, ११-३.
पुरुष: राहुल बैठा विजयी वि. ओम सेमवाल २-११, ११-७, ३-११, ११-५, ११-७.
