४१२ तक्रारींचा तात्काळ निपटारा
वसई : महावितरणच्या वसई मंडळ कार्यालयाच्या वतीने मागील आठवड्यात वीज ग्राहकांसाठी आचोळे, नालासोपारा, विरार परिसरात समाधान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात परिसरातील ७७० वीज ग्राहकांनी हजेरी लावली.
या शिबिरात ४१२ वीज ग्राहकांच्या वाढीव देयकाच्या संदर्भातील तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यात आले. तसेच स्मार्ट मीटर संदर्भात असलेल्या अनेक शंकांचे उपस्थित तांत्रिक अधिकाऱ्यांनी प्रात्यक्षिक दाखवून स्मार्ट मीटरची उपयोगिता समजावून सांगितली. या सोबतच वीज ग्राहकांच्या समाधानासाठी ३५८ ठिकाणी समानांतर मीटर लावण्यात आले. यामुळे स्मार्ट मीटर वेगाने फिरते हा गैरसमज दूर होण्यास मदत झाली वसई -विरार, नालासोपारा,  परिसरातील वीज ग्राहकांच्या समाधानासाठी यापुढे देखील समाधान शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच ग्राहकांनी मागणी केली तर समानांतर मीटर लावण्यास महावितरण तयार असल्याची माहिती अधिक्षक अभियंता माणिक राठोड यांनी दिली.
००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *