मुंबई: कुर्ला येथील  हनुमान क्रीडा मंडळ यांनी राहुल शेवाळे यांच्या राधा फाउंडेशन चेंबूर येथे आठ थर लावून सलामी दिली.  हनुमान क्रीडा मंडळ कुर्ला तील नावाजलेले मंडळ असून १९६५ पासून दहीहंडी उत्सव जोशात साजरा करत आहेत.  ठाण्यात मानाची असणारी स्व. आनंद दिघे यांची दहीहंडी सलग तीन वर्षे फोडून हॅटट्रिक साधली होती. तसेच  ठाण्यात सर्व प्रथम सात थर लावून हंडी फोडली होती.  कुर्ला येथे‌ दहिहंडी उत्सव जोशात साजरा केला जातो अनेक मंडळे थरावर थर लावून हंडी फोडायला जातात.  हनुमान क्रीडा मंडळाने यावर्षी सर्वात प्रथम आठ थर लावण्याचा मान मिळवला.  बाळकृष्ण हुटगी यांच्या मनसे च्या दहिहंडी त दोन वेळा आठ थर रचण्यात अपयश येऊन सुद्धा न खचता राधा फाउंडेशन चेंबूर येथे राहूल‌ शेवाळे यांनी लावलेल्या दहीहंडी त यशस्वी आठ थर रचून मानवंदना दिली. मंडळाचे अध्यक्ष कमलाकर बने यांनी सर्व गोविंदा चे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *