पनवेल  :
पनवेल शहरात वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या रिक्षाचालकांवर पनवेल शहर वाहतूक शाखा व प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने विशेष रिक्षा कारवाई मोहीम राबविण्यात आली. शनिवारी सकाळी ९.३० ते ११.३० वाजेपर्यंत पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी, पनवेल शहर वाहतूक शाखा व अनिल गेळे, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक, प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सदर संयुक्त कारवाई करण्यात आली. या विशेष मोहिमेदरम्यान फ्रंट सीट बसविणे, गणवेश न घालणे, मीटरप्रमाणे रिक्षा न चालविणे तसेच इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली.
एकूण १६६ रिक्षांवर कारवाई करण्यात आली असून, एकूण ₹२,७७,६५०/- इतका दंड आकारण्यात आला. सदर कारवाईदरम्यान पनवेल शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. पनवेल शहरातील नागरिकांची सुरक्षितता व वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत करण्याच्या दृष्टीने यापुढेही पनवेल शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी अशाच प्रकारच्या विशेष रिक्षा तपासणी व कारवाई मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार आहेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल. रिक्षाचालकांनी प्रवाशांची सुरक्षितता व सुविधा लक्षात घेऊन वाहतुकीचे सर्व नियम पाळावेत, गणवेश परिधान करावा आणि मीटरप्रमाणे भाडे आकारावे.“वाहतुकीचे नियम पाळा, सुरक्षित प्रवास करा!”
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *