पाव तयार करून शहरातील विविध दुकानांमध्ये केला जात होता पुरवठा

कल्याण : पाव तयार करण्यासाठी लाकडाची भट्टी वापरल्याच्या तक्रारीवरून अन्न व औषध प्रशासनाने कल्याणमधील नामांकित प्रिन्स बेकरीवर कारवाई करून ती सील केली आहे. विभागाकडून पुढील कारवाई सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रिन्स बेकरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाव तयार करून कल्याण शहरातील विविध दुकानांमध्ये त्याचा पुरवठा केला जात होता. लाकडी भट्टी वापरली जात असल्याची तक्रार मिळाल्यानंतर एफडीएच्या पथकाने बेकरीची पाहणी करून कारवाई केली.

बेकरी सील केल्यानंतर शहरातील इतर बेकरी व्यावसायिकांमध्येही चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, बेकरी कर्मचारी नसीम खान यांनी यापूर्वी कोणतीही नोटीस देण्यात आली नसल्याचे सांगितले. तसेच बेकरीमध्ये लाकडाचा वापर करता येत नाही, याची आपल्याला माहिती नव्हती, असा दावा त्यांनी केला. दरम्यान, या कारवाईमागील नेमकी कारणे आणि पुढील कार्यवाहीबाबत एफडीए प्रशासनाकडून सविस्तर माहिती मिळणे बाकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *