नवी मुंबई: अखिल भारतीय माथाडी सुरक्षारक्षक-श्रमजिवी आणि जनरल कामगार युनियन तसेच अखिल भारतीय कामगार सहकारी पतपेढीच्या नव्या कार्यालयाचे उदघाटन सोमवारी ७ सप्टेंबरला होणार आहे,असे युनियनचे अध्यक्ष राजन म्हात्रे- सरचिटणीस अरुण रांजणे यांनी सांगितले. ४१८, मध्यवर्ती सुविधा इमारत, ५वा.मजला,ए.पी.एम.सी.फळ मार्केट , तुर्भे-नवी मुंबई हा नवीन कार्यालयाचा पत्ता आहे.या उदघाटनानिमित्त सोमवारी दुपारी १२.३० ते ४ पर्यत गणेशपूजन-वास्तूशांतीचा कार्यक्रम होणार आहे.सर्व माथाडी कामगार बंधू भगिनींचे यासाठी हार्दिक स्वागत आहे.सर्वांनी तीर्थ प्रसाद, पानसुपारी, अल्पोपाहारासाठी उपस्थित राहावे असे आवाहन अरुण रांजणे यांनी केले आहे.

0000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *