मुंबई : खेलो तायक्वांडो अकादमीची उदयोन्मुख खेळाडू हित्ती दिनेश साळवी हिची १४ वर्षांखालील मुलींच्या ३८ किलो वजनी गटात होणाऱ्या सीबीएसई राष्ट्रीय तायक्वाँडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या सीबीएसई तायक्वाँडो स्पर्धेत हित्ती हिने उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदक पटकावले.अंतिम फेरीत हित्तीला अटीतटीच्या लढतीत पुण्याच्या रिजल सावडतकरकडुन अवघ्या २ गुणांनी पराभव पत्करावा‌ लागला. पहिली फेरी रिजलने ११-१०. तर दुसरी फेरी देखील रिजलने १०-९ गुणांनी जिंकली. हित्तीने अंतिम फेरीत प्रवेश करण्या अगोदर आरोही यादव,अनिशा जोसेफ ,त्रियाहा अंधाळे या खेळाडूंना पराभुत केले.

सीबीएसई राष्ट्रीय तायक्वाँडो स्पर्धा हरियाणा येथे २० ते २४ सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. हित्ती सध्या ७ व्या इयत्तेत शिकत असुन ५ वर्षांपेक्षा जास्त काळ तायक्वांदो खेळाचे धडे गिरवत आहे. हित्तीला प्रशिक्षक स्वप्नील शाळुंके आणि प्रियंका परब यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे. हित्तीच्या या यशाबद्दल तिचे खास अभिनंदन करण्यात आले असून, आगामी सीबीएसई राष्ट्रीय तायक्वाँडो स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

0000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *