महापौर कॅरम स्पर्धेच्या पूर्वतयारी सराव उपक्रमात
मुंबई : आनंदराव अडसूळ चॅरिटेबल ट्रस्ट, चेंबूरनाका मनपा शाळा व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आयोजित मुंबई महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धे निमित्तच्या चेंबूर परिसरातील पूर्वतयारी सराव मार्गदर्शन उपक्रमात सार्थक वाघमारे सर्वोत्तम शिबिरार्थी ठरला. सार्थकला पुरस्कार देऊन नगरसेवक महादेव शिवगण, चेंबूरनाका मनपा शाळेच्या मुख्याध्यापिका इंद्रजीत कौर, मुख्याध्यापक यशवंत पवार, डॉ. जितेंद्र लिंबकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कॅरमपटू व राष्ट्रीय प्रशिक्षक नरसिंगराव सकारी यांच्या मार्गदर्शनामुळे नवोदित व उदयोन्मुख शालेय खेळाडूंनी आपल्या खेळात सुधारणा करीत दुसऱ्या दिवशी उत्तम सराव केला. परिणामी शाळेने देखील उदयोन्मुख खेळाडूंना दररोज चँम्पियन कॅरम बोर्डवर एक तास सराव देण्याचे ठरविले आहे. सर्वोत्तम शिबिरार्थी सार्थक वाघमारेला आयुष जगताप, रुद्र कडलक, अहमद रझा, विष्णू स्वर्णकार आदींनी चुरशीचे आव्हान सहभागी ६५ शालेय खेळाडूंमध्ये दिले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. प्रायोजित मुंबई महापौर चषक शालेय मुलामुलींची विनाशुल्क एकेरी कॅरम स्पर्धा २६ व २७ सप्टेंबर रोजी दादर-पश्चिम येथील को-ऑप. बँक एम्प्लॉईज युनियन सभागृहात होणार आहे.
०००
