मुंबई : भाजपचे इंजिन बिघडल्यामुळे त्यांना मनसेचं इंजिन सोबत घ्यावं लागलं, अशी बोचरी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. शरद पवारांचं आणि उध्दव ठाकरे यांचं इंजिन सुसाट चाललं आहे. त्यामुळे विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे की, आपल्या 10 ते 15 तरी जागा निवडून येतात का? अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.
नारायण राणे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली होती त्यावर जयंत पाटील यांनी ही बोचरी टीका केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे दुटप्पी भूमिका घेतात अशी सातारा टीका केली होती. त्याला जयंत पाटील यांनी उत्तर दिले. शरद पवार यांनी कधीही दुटप्पी भूमिका घेतलेली नाही. शाहू महाराजांना उमेदवारी घ्या म्हणून त्यांच्या मागे आम्ही लागलो होतो तर उदयनराजेंना मात्र दिल्लीला ताटकळत थांबावे लागले होते. मी उदयनराजे यांना मी सल्ला दिला असता उभे राहू नका म्हणून.आधी शशिकांत शिंदे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर उदयनराजे यांचे नाव जाहीर झाले आहे. त्यामुळे दुटप्पीपणा झालेलाच नाही असं उत्तर जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.
शशिकांत शिंदे हे संसदेत 100 टक्के हजेरी लावतील. मात्र विरोधात उदयनराजे भोसले हे 5 वर्षात फक्त 6 दिवस संसदेत गेले. लोकसभेत आणि राज्यसभेत आपण ज्यांना निवडून देतो ते जर हजर राहत नसतील तर ते धक्कादायक आहे. पूर्ण वेळ उपलब्ध असणारा नेता, 100 टक्के हजेरी लावून आणि प्रश्न विचारू शकणारा उमेदवार आम्ही दिला असल्याची खोचक टीका जयंत पाटील यांनी केली आहे.
