बच्चू कडू यांची माहिती

उल्हासनगर : दिव्यांग कल्याण मंत्रालय मंत्रीपदाच्या दर्जाचा पदभार हाताळताना केलेला पाठपुरावा आणि मागणीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांग मंत्रालय उभारण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी उल्हासनगरातील मेळाव्यात दिली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी दिव्यांगांच्या स्वप्नाची पूर्तता केल्याने त्यांचे आपल्यावर ऋण आहेत. त्यामुळे आपण शिवसेनेत सोबत असून कल्याण लोकसभा मतदार संघाचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन बच्चू कडू यांनी केले आहे.

उल्हासनगर-4 येथील स्वामी शांती प्रकाश हॉल येथे प्रहार जनशक्ती पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार 13 मे रोजी रात्री पार पडला.यावेळी बच्चू कडू यांनी दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग मंत्रालय उभारण्यात यावे आणि ते स्वप्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्षात उतरवले.माझ्यावर भरपूर गुन्हे दाखल असले तरी ते सर्वसामान्यसाठी लढलो म्हणून असून गुंडागर्दी केली नसल्याचे त्यांनी सांगितले.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांविरोधात ठाणे जिल्हात अनेक वेळा उपोषण तसेच आंदोलन करण्यात आले आहेत. त्यात काही प्रमाणात यश आले असले तरी काही अधिकाऱ्यांवर राजकीय नेत्यांचे वरदहस्त असल्यामुळे त्यांचावर कारवाई होत नाही. असा आरोप करतानाच निवडणूक संपल्यावर मी स्वतः उपोषणाला येऊन बसतो.

मग बघू सरकार या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कशी कारवाई करत नाही. असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला. यावेळी ठाणे जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटील, संपर्क प्रमुख हितेश जाधव, शहरप्रमुख प्रधान पाटील, पदाधिकारी बाळकृष्ण पाटील, श्याम भोईर, दिपक लढे, अविनाश सोनवणे, आलम खान, वसंत पानसरे, विजय मढवी, रक्षक म्हात्रे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *