ठाणे : निवृत्तीवेतन कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांनी कोणत्याही प्रकारच्या दूरध्वनीद्वारे व्यवहार करण्यापूर्वी कोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी व अपर कोषागार अधिकारी (निवृत्ती वेतन) सुरेंद्र राऊत यांनी केले आहे.
काही निवृत्ती वेतनधारकांकडून ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर कोषागारातील थकीत रक्कम मिळणार असल्याचे सांगून रक्कम ऑनलाईन, गुगल पे, फोन पे किंवा लइतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांव्दारे मागितल्याच्या तक्रारी जिल्हा कोषागार कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत निवृत्ती वेतनधारकांना कोणत्याही प्रकारचा फोन केला जात नाही तसेच कोषागाराच्या कर्मचाऱ्यांना घरीही पाठविले जात नाही.तसेच निवृत्तीधारकांनी परस्पर रक्कम भरल्यास ती त्यांची वैयक्तिक जबाबदारी राहील. यामुळे कोणत्याही प्रकारच्या दूरध्वनीद्वारे असे व्यवहार करण्यापूर्वी कोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी व अपर कोषागार अधिकारी (निवृत्ती वेतन) सुरेंद्र राऊत यांनी केले आहे.
