ठाणे : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरात चालणार्या १० अभ्यासिकांतील येऊरच्या आदिवासी पट्टयातील विद्यार्थ्यांनी दहावीच्या परिक्षेत उज्वल यश संपादन केले. यामध्ये येऊरच्या अभ्यासिकेतील १० विद्यार्थी ६० टक्क्यांवर गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ठामपा शाळेतील ३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तर सावरकरनगर अभ्यासिकेतील २ विद्यार्थ्यांनही ७० टक्क्यांहून अधिक गुण मिळविले आहेत.
यामध्ये ठामपा शाळेतील आरती पाटील 69.60% प्रथम, जयश्री वळवी ६९% द्वितीय, प्रेम भगत ६३.४०% तृतीय उत्तीर्ण झाले आहेत तर याच अभ्यासिकेतील राणी कापडी ५२%, कल्पेश डागा ६०%, वैशाली तुमडा ५३%, वेदिका ४७%, जागृती फुफाने ४२%, आदर्श मोरया या इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्याने ६०% गुण मिळविले आहेत तर सावरकर नगर अभ्यासिकेतील स्नेहल गाडे ७२.८०%, रक्षा कांदळगावकर ७३% व सागर दळवी ६२.८०% गुण मिळवून यशस्वी झाले आहेत. ठाण्यातील जिजाऊच्या अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांच्या उज्वल यश संपादन केल्याने ठाणे शहरातील विविध स्तरातून जिजाऊच्या उपक्रमाचे कौतूक होत असून ठाण्यातील अभ्यासिका वाढवून अधिकाधिक गरिब, गरजू अशा सर्वच विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण व शैक्षणिक साहित्य वाटपाचा संकल्प असल्याचे जिजाऊचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी सांगितले. ठाण्यातील जिजाऊच्या कोपरी डंपिंग, येउर, सावरकरनगर, कळवा महात्मा फुले नगर, ओवळा या डोंगराळ आणि मागास भागातील अभ्यासिकांमध्ये बीएड दर्जाचे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासात होत असलेली प्रगती पुढील काळात विद्यार्थ्यांचं उज्वल भविष्य घडविण्याचं स्वप्न जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने उराशी बाळगले असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच पोलीस भरती, अग्निशमन, मिलिटरी, युपीएससी, एमपीएससी आदी विविध स्पर्धा परिक्षांसाठी जिजाऊच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहनही निलेश सांबरे यांनी केले आहे.