सहा महिन्यापासून पगार दिला नसल्याने आत्महत्या केल्याचा आरोप

उल्हासनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या उल्हासनगर महापालिकेच्या मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीने गेल्या ६ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. या घटनेने उल्हासनगर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

उल्हासनगर महानगरपालिकेचे म्हारळ गावाच्या वेशीवर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे राजू धाटावकर यांना गेल्या ६ महिन्यांपासून पगार न मिळाल्याने लोनचे हप्ते भरू न शकल्याने सोमवारी दुपारी  3 वाजताच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.

या घटनेने शहरात संतापाचे वातावरण पसरले आहे. सदर  हॉस्पिटल हे मनपा प्रशासनाने खाजगी तत्वावर दिले असून येथील कर्मचाऱ्यांना अत्यंत कमी पगार दिला जातो व 12 – 12 तास काम करवून देखील वेळेवर पगार दिला जात नसल्याचा आरोप येथील कर्मचाऱ्यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *