मुंबई : कुस्ती क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल “पैलवान ग्रुप महाराष्ट्र राज्य* यांच्यावतीने” पैलवान सुभाषदादा पाटील सर युथ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य ” यांच्यावतीने भाईंदर येथील श्री गणेश आखाड्याचे सर्वेसर्वा वस्ताद वसंतराव पाटील यांना जीवनगौरव पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. समर्थ मंगल कार्यालय, बामणी- शेंडूर फाटा येथे झालेल्या पुरस्कार वितरण समारंभात पाटील यांना हा पुरस्कार देण्यात आला.
सदर प्रसंगी सदानंद सदाशिव, पोलिस उपअधीक्षक कोल्हापूर, सुशील अग्रवाल दैनिक रोखठोक, नाजरुद्दिन नायकवडी शिवछत्रपती पुरस्कार विजेते, डॉ. कृष्णदेव गिरी सदस्य मराठी शब्दकोश, सौ. राधिका पन्हाळे सामाजिक कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
अध्यक्षीय भाषणात उप महाराष्ट्र केसरी अमृतमामा भोसले यांनी वस्ताद वसंतराव पाटील यांच्या कार्याचा आढावा घेतला. गेल्या ३० वर्षापेक्षा जास्त काळ वसंतराव पाटील मीरा-भाईंदरमध्ये युवा कुस्तीपटू तयार करण्याचे मोठे काम करत आहेत. कुस्ती बरोबरच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात देखील पाटील यांचे उल्लेखनीय कार्य आहे. पाटील यांना मिळालेल्या जीवनगौरव पुरस्काराबद्दल श्री गणेश आखाड्यातील सर्व पैलवान, पालक व वस्ताद यांच्यातर्फे त्यांचे खास अभिनंदन करण्यात आले आहे.
