राहुल गांधींची खोचक टीका

नवी दिल्ली : देशात विश्वगुरू म्हणून स्वताची प्रतिमा निर्माण करणारे, रशिया – युक्रेन युद्ध थांबवल्याची वल्गना करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील लोखो युवकांचे भविष्य ठरविणारी नीट आणि सेटच्या परिक्षेतील पेपरफुटी मात्र थांबवू शकत नाही अशी खोचक टिका दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत केली.

 राष्ट्रीय पात्रता-प्रवेश परिक्षेमध्ये देशभरात जो गोंधळ पाहायला मिळाला, त्यावरून आता NEET परिक्षा देणारे विद्यार्थी देशभरात रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. या पेपरफुटी प्रकरणामुळे देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपाकडून शैक्षणिक क्षेत्र ताब्यात घेतल्यामुळेच पेपरफुटी प्रकरणे घडत आहेत. पेपरफुटीची प्रकरणे थांबण्याऐवजी ती वाढतच आहेत. भाजपाने शैक्षणिक संस्थांवर आपल्या विचारांचे लोक नियुक्त केले आहेत. पेपरफुटीवर या लोकांकडून कार्यवाही होण्याची गरज होती, मात्र त्यांनी काहीच केले नाही. सुमार लोक शैक्षणिक संस्थांवर नेमल्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. या प्रकरणी आता चौकशी सुरू आहे. या पेपरफुटीसाठी जे जे लोक जबाबदार आहेत, त्यांना अटक करून कारवाई केली गेली पाहीजे”, असेही राहुल गांधी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *