नवी दिल्ली :तामिळनाडूतील कल्लाकुरिची जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने झालेल्या मृतांचा आकडा ६३ वर पोहोचला आहे. अशातच विधानसभेत पावसाळी अधिवेशनात या प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागणाऱ्या व प्रश्नोत्तराचा तास स्थगित करून यावर चर्चा करण्याची मागणी करणाऱ्या विरोधी पक्ष एआयडीएमकेच्या सर्व आमदारांना अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.

तमिळनाडूचे सभापती एम अप्पावू यांनी विधानसभेच्या कामकाजात व्यत्यय आणणाऱ्या AIADMK आमदारांना सभागृहातून बाहेर काढण्याचे आदेश दिले आहेत. AIADMK आमदारांनी प्रश्नोत्तरांचे सत्र तहकूब करण्याची मागणी केली होती. मंगळवारी काही आमदारांना निलंबित करण्यात आले होते. बुधवारी सकाळीच कामकाज सुरु होताच गोंधळ घालणाऱ्या सर्व आमदारांना निलंबित करण्यात आले.

एआयएडीएमकेच्या आमदारांना या संपूर्ण विधानसभेच्या अधिवेशनातून निलंबित करण्याचा ठराव तामिळनाडू विधानसभेत मंजूर करण्यात आला. यानुसार तामिळनाडूचे विरोधी पक्ष नेते इडाप्पाडी पलानीस्वामी आणि इतर AIADMK आमदारांना या संपूर्ण विधानसभा अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. सभागृह नेते टी.एन. जलसंपदा मंत्री दुराईमुरुगन यांनी विधानसभेच्या नियमांच्या 121 (20) अंतर्गत यासंदर्भात ठराव मांडला होता. हे अधिवेशन २९ जून रोजी संपणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *