Author: bittambatami.com

 महात्मा गांधींचा देशाच्या फाळणीला विरोधच होता -डॉ. विवेक कोरडे

राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त, ठाण्यात ‘हुतात्मा दिन’ संपन्न महात्मा गांधींचा देशाच्या फाळणीला विरोधच होता -डॉ. विवेक कोरडे अनिल ठाणेकर ठाणे : महात्मा गांधी हे कधीही देशाची फाळणी व्हावी या विचाराचे नव्हते, उलट त्यांचा देशाच्या फाळणीला विरोधच होता. ज्या आरएसएसने कधीही राष्ट्रध्वज स्विकारला नाही, त्यांचाच द्विराष्ट्रवादाला पाठिंबा होता आणि विनायक दामोदर सावरकर हे त्यांचे म्होरके होते. गांधीजी हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे एकमेव पुरस्कर्ते होते, अहिंसेचे पुजारी होते, अशा शब्दांत ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. विवेक कोरडे यांनी आपले परखड मत मांडले. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७८व्या पुण्यतिथीनिमित्त, धर्मराज्य पक्ष, ठाणे काँग्रेस आणि मूलभूत अधिकार संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने, ३० जानेवारीला, ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात ‘हुतात्मा दिन’ साजरा करण्यात आला. ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. विवेक कोरडे व डाव्या चळवळीतील विद्रोही नेते कॉ. आनंद तेलतुंबडे यांनी, “गांधीहत्या आणि आपण…” या विषयावर आपले मनोगत व्यक्त करुन, उपस्थितांना मार्गदर्शन केले.’धर्मराज्य पक्षा’चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे यांच्या पुढाकाराने संपन्न झालेल्या या कार्यक्रमासाठी काँग्रेसच्या अर्थ विभागाचे अध्यक्ष विश्वास उटगी, आयटकचे काॅ. उदय चौधरी, वंदना शिंदे, मूलभूत अधिकार संघर्ष समितीचे डॉ. जावळे, समाजवादी नेते संजय मं. गो., जगदीश खैरालिया, आंबेडकरवादी विचारवंत आनंदा होवाळ, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे उपजिल्हाप्रमुख प्रदीप शिंदे, काँग्रेसचे ठाणे जिल्हा सरचिटणीस महेंद्र म्हात्रे, काँग्रेस ठाणे सचिव राहुल पिंगळे, ॲड. नाना अहिरे आदी मान्यवर मंडळींची प्रमुख  उपस्थिती होती. दरम्यान, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. विवेक कोरडे यांनी, आपल्या भाषणात उपस्थितांना संबोधित करताना, गांधी हत्येमागील कारणे विषद करताना तथाकथित हिंदुत्ववादी व आरएसएसवर एकच शरसंधान साधले. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात आनंद तेलतुंबडे यांनीदेखील आरएसएसच्या विचारांवर एकच प्रहार केला. सद्यस्थितीत भारतातील जी राजकीय व सामाजिकव्यवस्था ढासळलेली आहे, त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाची जातीयवादी विचारसरणीच कारणीभूत असल्याचे स्पष्ट करुन ते पुढे म्हणाले की, “पुढील  एकहजार वर्षे तरी भारतातून भाजपची सत्ता जाणार नाही, जोपर्यंत ते ठरवत नाहीत”, असा अपप्रचार होत असला; तरी त्यात बिलकूल तथ्य नाही…आपण सारे एकत्र आलो आणि त्यांचं सगळं साम्राज्य, हे फक्त आणि फक्त, खोटारडेपणाच्याच पायावर उभारलेलं आहे, हे ध्यानात घेऊन त्यावर एकत्रित व सनदशीर मार्गाने प्रहार केला; तर, ते सहजशक्य आहे. आज त्यांनी सर्व शासकीय व प्रशासकीय व्यवस्था ताब्यात घेतलेल्या आहेत. राजन राजे यांच्यासारखी जी काही हाताच्या बोटावर काम करणारी मोजकी माणसं समाजात आहेत, त्यामुळेच भाजप-आरएसएससारख्या धर्मविद्वेशीशक्तींवर काही प्रमाणात का होईना, अंकुश आहे यातच समाधान असल्याचे प्रतिपादन आनंद तेलतुंबडे यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, विद्रोही शाहीर संभाजी भगत यांनी खास उपस्थिती लावून आपल्या पहाडी आवाजात कविता सादर केळी. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिरीष ढवळे यांनी केले तर, कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

जागतिक कर्करोग दिन

जागतिक कर्करोग दिन ‘जागरूकता, प्रतिबंध आणि वेळेवर उपचार हेच कर्करोगावरचे प्रभावी शस्त्र’ अनिल ठाणेकर ठाणे-दरवर्षी ४ फेब्रुवारी हा दिवस जगभरात जागतिक कर्करोग दिन म्हणून पाळला जातो. कर्करोगाबाबत जनजागृती वाढवणे, प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे तसेच वेळेवर निदान व उपचारांचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवणे…

इंधन वाचवा हरित ऊर्जा वापरा देशाला वाचवा

इंधन वाचवा हरित ऊर्जा वापरा देशाला वाचवा रमेश औताडे मुंबई : सार्वजनिक परिवहन सेवा वापर करा व इंधन वाचवा असे आवाहन करत कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी हरित ऊर्जा वापरण्याचे व पर्यावरण रक्षण करण्याचे आवाहन सक्षम २०२५ – २६ (संरक्षण क्षमता महोत्सव ) या देशातील ऑइल  कंपन्याच्या जनजागृती कार्यक्रमात रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी, मुंबई येथे केले. या कार्यक्रमाचे अंतिम उद्दिष्ट म्हणजे जीवाश्म इंधनावरील वाया जाणारा खर्च रोखणे, परकीय तिजोरीवरील बाडता भार कमी करणे आणि जीवाश्म इंधन जाळण्यामुळे निर्माण होणाऱ्या हरितगृह वायूंच्या प्रतिकूल परिणामांपासून पर्यावरणाचे संरक्षण करणे, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि तेल उद्योगाचे राज्यस्तरीय समन्वयक संबंधित राज्य सरकारच्या सक्रिय सहभागाने समर्थनाने जनजागृती पसरविण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतात. सक्षम (संरक्षण क्षमता महोत्सव) २०२५-२६ हे १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान आयोजित केले जातील, संपूर्ण देशभर ज्याची टॅगलाइन “कन्सर्व ऑइल अँड गॅस, गो ग्रीन” अशी असेल. १ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत तेल विपणन कंपन्या (ओएमसी) राज्यभरात संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी वर्तनात्मक बदलांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे असे महाराष्ट्र कार्यक्रम समन्वयक दिपक वाघ यांनी सांगितले. उमेश विलास कुलकर्णी, राज्यस्तरीय समन्वयक (पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू), महाराष्ट्र, थॉमस जेम्स, प्रमुख रिटेल (पश्चिम), बीपीसीएल, मिहिर जोशी, राज्य प्रमुख (रिटेल), एमएच-१ आणि गोवा, बीपीसीएल, वरुण कुमार, उपमहाव्यवस्थापक ऑपरेशन्स पश्चिम विभाग, एचपीसीएल, देवांशु मिश्रा महाव्यवस्थापक ल्युब्स, आयओसीएल, जितेंद्र गुप्ता, महाव्यवस्थापक (विपणन), गेल इंडिया लिमिटेड यांचा समावेश होता.

फेसबुकचा वाढदिवस!

विज्ञानामुळे जग जवळ आले आहे असे लहानपणी ऐकले होते ; पण याची खरी प्रचिती फेसबूक या सोशल नेटवर्किंग साईटमुळेच आली. फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटला आज म्हणजे ४ फेब्रुवारी रोजी…

बँकांमधील ‌‘एफडीआय‌’ वाढवण्याचा सरकारचा विचार

भारत सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) मर्यादा सध्याच्या वीस टक्क्यांवरून 49 टक्क्यांपर्यंत वाढवण्यासाठी आंतर-मंत्रालयीन पातळीवर सक्रियपणे विचारविनिमय करत आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार अर्थ मंत्रालय गेल्या काही महिन्यांपासून देशाच्या…

अमेरिका-क्युबादरम्यान शत्रुत्त्व का ?

व्हेनेझुएलामध्ये सत्तेचा आणि ताकदीचा नंगा नाच केल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता क्युबाकडे वाकड्या नजरेने पहात आहेत. ट्रम्प यांनी क्युबाला ‌‘करार करा, अन्यथा परिणामांना सामोरे जा‌’ असा इशारा दिला आहे.…

आता भविष्याचे आव्हान

आता भविष्याचे आव्हान अजित पवार यांच्या अकाली निधनाच्या बातमीमधून अद्याप न सावरलेल्या नेत्यांपुढे नवा प्रश्न उभा ठाकतो आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू झाला आहे. अजितदादा असताना दोन्ही राष्ट्रवादी…

ऐरोली विभागात अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई

ऐरोली विभागात अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई नवी मुंबई : महानगरपालिका विभागामार्फत मा.आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त (२) डॉ.राहुल गेठे व उप आयुक्त (अतिक्रमण) डॉ.कैलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली…

 केडीएमसी प्रशासनाने आश्वासनांची पुर्तता न केल्याने आझाद मैदानात उपोषणाचा इशारा

केडीएमसी प्रशासनाने आश्वासनांची पुर्तता न केल्याने आझाद मैदानात उपोषणाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते नोवेल साळवे यांचे मुख्य सचिवांना पत्र कल्याण: नागरिकांच्या सुविधांच्या प्रश्नांवर १२ डिसेंबर २०२२ आणि १४ जानेवारी २०२५ रोजी आंदोलन दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या…

सुमेधा चिथडे यांचे कल्याण मध्ये व्याख्यान

सुमेधा चिथडे यांचे कल्याण मध्ये व्याख्यान कल्याण: “वंदे मातरम” या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण पूर्ती निमित्त रविवारी ८ फेब्रुवारी, सायंकाळी ४:३० वाजता ऐतिहासिक कल्याणाच्या सुभेदार वाड्यात “राष्ट्राय स्वाहा इदम न मम” या…